लिंबू: रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय लावा. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. तसेच यकृत निरोगी राहते.
(shutterstock)आल्याचे पाणी: सकाळी आल्याचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते. शरीरात जमा झालेली चरबी बाहेर काढण्यास मदत होते.
काकडीचे पाणी: काकडीचे तुकडे रात्रभर पाण्यात भिजवून ते सकाळी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. हे शरीराला हायड्रेट करते आणि जळजळ कमी करते.
अॅपल साइडर व्हिनेगर: इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्याबरोबरच खूप भूक लागल्यास अॅपल साइडर व्हिनेगर पाण्यात मिसळून रोज प्या. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
पुदिना: गॅस, ब्लोटिंग आणि पोट फुगणे यामुळे पोट भरलेले किंवा वाढलेले वाटत असेल तर दररोज पुदिन्याचे पाणी प्यावे. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.