Vastu Tips : सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी पाहाणं मानलं जातं अशुभ
Vastu Tips : वास्तुशास्त्रात काही गोष्टी अशा सांगण्यात आल्या आहेत ज्या सकाळी उठल्यावर करू नये. त्या गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूया.
(1 / 5)
आपली सकाळी ही नेहमी फ्रेश आणि प्रसन्न असायला हवी. उठल्या उठल्या काही सवयी अशा आहेत ज्या करणं आपण सोडून दिलं पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार सकाळी या गोष्टी केल्यास त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात.
(2 / 5)
आपण सकाळी उठल्यावर काही गोष्टी कळत किंवा नकळतही करू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊया.
(3 / 5)
अनेकांना सकाळी उठल्यावर आरशात पाहण्याची सवय असते. परंतु हिंदू शास्त्रानुसार सकाळी चेहरा आरशात पाहणे हे अशुभ लक्षण आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर आरशात आपला चेहरा पाहाणे सोडून दिलं पाहिजे असं वास्तुशास्त्र सांगतं.(Pixabay)
(4 / 5)
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सकाळी खरकट्या भांड्यांकडे पाहाणं टाळलं पाहीजे. खरकटी भांडी रात्री तशीच ठेवू नये असंही वास्तुशास्त्र सांगतं. मात्र काही कारणास्तव रात्रीची खरकटी भांडी तशीच राहील्यास त्यांच्याकडे पाहाणं टाळावं. अन्यथा त्याने तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
(5 / 5)
अनेकांना आपलीच सावली पाहायला खूप आवडतं. मात्र सकाळी उठल्यावर आपली सावली पाहाणे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपली सावली पाहू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. (Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
इतर गॅलरीज