मेंदूपर्यंत रक्त व्यवस्थित पोहोचले नाही तर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. जगात दरवर्षी सुमारे दोन कोटी लोक ब्रेन स्ट्रोकने ग्रस्त असतात. जगभरात या ब्रेन स्ट्रोकग्रस्तांची संख्या वाढत आहे. बऱ्याच लोकांना माहित नसेल की घाणेरडे, अस्वच्छ दात हे ब्रेन स्ट्रोकचे एक कारण आहे. जाणून घ्या
अलीकडेच जपानमधील हिरोशिमा विद्यापीठातील संशोधकांच्या एका गटाने आपल्या अभ्यासात दावा केला होता की दात अस्वच्छ असतील तर दात किडण्यास जबाबदार असलेले दातांमध्ये वाढणारे जीवाणू स्ट्रोकचा धोका वाढवू शकतात.
या जपानी संशोधकांचा असा दावा आहे की, हा जीवाणू मेंदूच्या नसांमधील रक्ताभिसरणात अडथळा आणतो. यामुळे मेंदूतील सामान्य रक्तप्रवाह विस्कळीत होते, ज्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढतो. सुमारे ३५८ रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी हा निष्कर्ष काढला.
या ३५८ लोकांपैकी बहुतांश लोक ५० ते ६० वयोगटातील आहेत. संशोधकांच्या लक्षात आले आहे की त्या प्रत्येकाच्या दातांमध्ये बॅक्टेरिया आहेत. त्यामुळे सर्व वयोगटातील लोकांसाठी दातांची काळजी घेण्यावर भर देण्याची गरज आहे. दात नियमित स्वच्छ करून दात किडणे रोखण्याबरोबरच स्ट्रोकचा धोका कमी करा.