डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे ११ जणांना प्राण गमवावे लागले आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की पाच किमी परिसरात आवाज ऐकू आले. स्फोटामुळे धुराचे प्रचंड लोट परिसरात पसरले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमाने आगीवर नियंत्रण मिळवले.
डोंबिवलीच्या एमआयडीसीतील सोनारपाडा परिसरातील अंबर केमिकल फॅक्टरीत हा स्फोट झाला. या कारखान्यात रिअॅक्टरमध्ये स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली. हा स्फोट इतका मोठा होता की पाच किमी परिसरात त्याचा आवाज ऐकू आला होता. स्फोटानंतर लागलेल्या आगीची झळ आजूबाजूला आठ कारखान्यांना पोहचली.
डोंबिवलीत एमआयडीसी परिसरातील केमिकल फॅक्टरीत झालेल्या स्फोटांची तीव्रता इतकी भीषण होती की परिसरातील अनेक निवासी इमारतींच्या खिडकीच्या काचा फुटल्या होत्या.
स्फोटात आत्तापर्यंत ११ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर डोंबिवली आणि परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत इत्यादींनी घटनास्थळाला भेट दिली आहे.