Wednesday Remedies: करिअरमध्ये अडथळे येत असतील तर बुधवारी काही सोपे उपाय केल्यास श्रीगणेशाची कृपा आपल्यावर होऊ शकते
(1 / 5)
बुधवारचा दिवस हा गणपतीला समर्पित दिवस आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते.विघ्नहर्ता गणेश आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतो. व्यवसाय वृद्धी आणि लाभासाठी बुधवारी गणेश पूजनासोबतच आणखी कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घेऊया.
(2 / 5)
बुधवारी हिरव्या मुगाचे दान करावे. या दिवशी हिरवे मूग डाळ खाणे फायदेशीर आहे. असे केल्याने तुमच्या कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते असे मानले जाते.
(3 / 5)
कोणत्याही कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर बुधवारी गणेश स्तोत्राचे पठण करावे. असं केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील.
(4 / 5)
बुधवारी गणेशाला शमी अर्पण करावं. श्रीगणेशाला शमीपत्रासोबत दुर्वांचा घासही अर्पण करावा, असे केल्याने श्रीगणेश लवकर प्रसन्न होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात.
(5 / 5)
बुधवारी गाईंना चारा खाऊ घातल्यास देवी देवतांचा आशिर्वाद मिळतो असं सांगितलं जातं. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील.