
6) डेव्हिड वॉर्नर- David Warner : २०१७ मध्ये सनरायर्झ हैदराबादकडून खेळताना वॉर्नरने ४३ चेंडूत शतक ठोकलं होतं. केकेआरविरुद्ध वॉर्नरने १२६ धावा ठोकल्या होत्या. या खेळीत त्याने १० चौकार आणि ८ षटकार मारले होते.
5) एबी डिव्हिलियर्स - AB de Villiers : आरसीबीकडून खेळताना एबीडीने २०१६ मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध ४३ चेंडूत शतक ठोकलं होतं. या खेळीत त्याने १२ षटकार आणि १० चौकारांसह १२९ धावा केल्या होत्या.
4) अॅडम गिलख्रिस्ट - Adam Gilchrist २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना गिलीने मुंबईविरुद्ध ४२ चेंडूत शतक ठोकलं होतं. त्याने १० षटकार आणि ९ चौकारांच्या साह्याने १०९ धावा केल्या होत्या.
3) डेव्हिड मिलर- Dave Miller : २०१३ मध्ये किंग्स पंजाबकडून खेळताना मिलरने ३८ चेंडूत शतक ठोकलं होतं. ७ चौकार आणि ८ चौकारांच्या साह्याने त्याने आरसीबीविरुद्ध नाबाद १०१ धावा केल्या होत्या.
2) युसुफ पठाण- Yusuf Pathan : यूसुफने २०१० मध्ये मुंबईविरुद्ध ३७ चेंडूत शतक ठोकलं होतं. त्याने ८ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या होत्या.
1) ख्रिस गेल- Chris Gayle : आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ख्रिस गेलनं ठोकलं आहे. त्याने २०१३ मध्ये आरसीबीकडून खेळताना पुणेविरुद्ध ३० चेंडूत शतक केलं होतं. त्याने १३ चौकार आणि १७ षटकारांच्या मदतीने नाबाद १७५ धावा केल्या होत्या.




