पीसीओएस ही अशी स्थिती आहे जिथे अंडाशय असामान्य प्रमाणात एंड्रोजन तयार करतात ज्यामुळे अंडाशयात सीस्ट तयार होतात. यामुळे मासिक पाळीतील अनियमितता, मुरुम तयार होणे, मूड स्विंग आणि लठ्ठपणा होऊ शकतो. आहारतज्ञ टॅलीन हॅक्टोरियन यांनी पीसीओएसबद्दल काही फॅक्ट्स शेअर केली जी आपल्याला आधी माहित नसतील. येथे जाणून घ्या
पीसीओएसची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदलू शकतात. हे तीव्रतेवर आणि दिसत असलेल्या लक्षणांवर अवलंबून असते. स्थितीचे निदान होण्यास २-३ वर्षे लागू शकतात.
अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांच्या कॉम्बिनेशनमुळे पीसीओएस होतो. त्यांच्या पुनरुत्पादक वयातील कमीत कमी ५ पैकी १ महिला पीसीओएसने प्रभावित आहे.
पीसीओएसमुळे इन्सुलिन रेसिस्टन्स होऊ शकतो. यामुळे टाइप २ मधुमेह होऊ शकतो, जो महिलांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर परिणाम करू शकतो.
पीसीओएसची लक्षणे जसे की वजन वाढणे, मुरुम तयार होणे, फेशियल हेअर आणि प्रजनन समस्या बऱ्याच स्त्रियांमध्ये चिंता आणि नैराश्यास कारणीभूत ठरू शकतात.