चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यात सुंदर डोळे खूप मोठी भूमिका बजावतात. यामुळेच लोक मेकअप करताना डोळ्यांच्या मेकअपकडे विशेष लक्ष देतात. डोळ्यांना मेकअप लावणे जितके सोपे आहे तितकेच काहींसाठी अवघडही आहे. डोळ्यांचा मेकअप करताना थोडीशी चूकदेखील डोळ्यांचं सौंदर्य कमी करतात. जर तुमचे डोळे लहान असतील तर ते मोठे दिसण्यासाठी काही विशेष गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
डोळ्यांच्या मेकअपसाठी तुम्ही बाजारातून एखादे नवीन उत्पादन खरेदी करत असाल तर डोळ्यांवर लावण्यापूर्वी त्याची पॅच टेस्ट करून घ्या.
मेकअप करताना मुलींना अनेकदा त्यांच्या पापण्यांना हेवी लूक द्यायला आवडते. डोळ्यांचा लुक खराब होतो.
जाड आयलायनर लावणे टाळा - ज्यांचे डोळे लहान आहेत त्यांनी नेहमी पातळ आयलायनर लावावे. जाड लायनर लावणे टाळावे. जाड आयलायनर लावल्याने डोळे लहान आणि पातळ दिसतात. पातळ लायनरसह तुम्ही हेवी मस्करा वापरू शकता.
तुमचे डोळे मोठे दिसण्यासाठी तुम्ही फक्त डोळ्यांच्या कोपऱ्यांवर काजळ लावू शकता. जर तुम्ही संपूर्ण डोळ्यावर काजळ लावत असाल तर ते शेवटपर्यंत नेऊन वरच्या दिशेने स्ट्रोक मारा. याशिवाय डोळ्यांच्या आतून पांढऱ्या रंगाच्या पेन्सिलने काजळ लावा.