Healthier Alternatives for Milk Tea: जर आपण थोडा जास्त दुधाचा चहा घेत असाल आणि हेल्दी स्विच-अप हवं असेल तर हे पाच पर्याय आपल्या आरोग्यासाठी उत्तम असून क्रेविंग पूर्ण करतील.
(1 / 8)
"दुधाच्या चहाचे जास्त सेवन, विशेषत: जर त्यात साखर आणि कॅफिनचे प्रमाण जास्त असेल तर वजन वाढणे, पाचक समस्या, आम्लपित्त आणि दंत समस्यांचा धोका वाढू शकतो'', असे आयुर्वेद आणि गट हेल्थ कोच डॉ. डिंपल जंगडा म्हणतात. (Unsplash)
(2 / 8)
चहाच्या पानांमध्ये किंवा चहापत्तीमध्ये दूध एकत्र केल्याने चहामध्ये आढळणाऱ्या कॅटेचिनसारख्या काही अँटीऑक्सिडंट्सच्या शोषणात अडथळा निर्माण होतो. हा इंटरॅक्शन हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य आणि अँटीऑक्सिडेंट अॅक्टिव्हिटीवर चहाचे फायदेशीर प्रभाव कमी करतो," असे डॉ. जांगडा म्हणतात. त्यांनी नुकत्याच केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दुधाच्या चहाचे काही आरोग्यदायी पर्याय शेअर केले आहेत. (Unsplash)
(3 / 8)
गोल्डन मिल्क: हळद, दालचिनी आणि आल्यापासून बनवलेले हे सूदींग ड्रिंक आहे. हे उबदार, मसालेदार पेय त्याच्या अंटी इंफ्लेमेटरी फायदे आणि आरामदायक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. (Shutterstock)
(4 / 8)
कॅमोमाइल: शांत करण्याच्या गुणधर्मांसाठी ओळखला जाणारा, कॅमोमाइल टी तणाव कमी करण्यासाठी आणि झोपेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट आहे. (Shutterstock)
(5 / 8)
पेपरमिंट: रिफ्रेशिंग आणि थंड गुणधर्मांसाठी ओळखले जाणारे, पेपरमिंट टी पाचक समस्या शांत करण्यास आणि मळमळ दूर करण्यास मदत करते. (Pixabay)
(6 / 8)
आलं: मसालेदार आणि गरम, आल्याचा चहा पचनासाठी उत्तम आहे. जळजळ कमी करतो आणि मळमळ कमी करतो. (Unsplash)
(7 / 8)
ग्रीन टी: बायोएक्टिव्ह संयुगे, अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्सने समृद्ध ग्रीन टी शरीरातील पेशींचा ऱ्हास कमी करण्यास मदत करतो. (Unsplash)
(8 / 8)
हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की जरी नैसर्गिक उपचार सर्वसमावेशक धोरणे देतात, परंतु प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद भिन्न असू शकतो. आपल्या आहारात कोणतेही नवीन उपचार किंवा सप्लीमेंट्स जोडण्यापूर्वी प्रशिक्षित हेल्थ केअर प्रोफेशनल्सचा सल्ला घ्या, विशेषत: जर आपण कोणतीही औषधे घेत असाल किंवा आधीपासून वैद्यकीय परिस्थिती असेल तर.