मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी करा या १० सोप्या गोष्टी, आभाळाला भिडेल यश

Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीच्या दिवशी करा या १० सोप्या गोष्टी, आभाळाला भिडेल यश

Jan 05, 2024 06:24 PM IST Priyanka Chetan Mali
  • twitter
  • twitter

Makar Sankranti 2024: मकर संक्रांती सोमवार १५ जानेवारी २०२४ रोजी साजरी केली जाईल. सूर्य उत्तरायणाच्या दिवशी विशेष संक्रांतीचे उपाय केल्यास वर्षभर सुख-समृद्धी लाभते आणि नोकरीत अडचणी येत नाहीत असे म्हटले जाते. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारत कृषीप्रधान देश आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात. हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात दर्शवितो आणि कापणीच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतात साजरा केला जातो.
twitterfacebookfacebook
share

(1 / 12)

मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नानाला खास महत्व आहे, या दिवशी गंगेत स्नान केल्याने मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते. मकर संक्रांतीला  शास्त्रामध्ये अशा १० गोष्टी आहेत ज्या केल्याने सुख-समृद्धी लाभते, करिअरमध्ये यश मिळते, आर्थिक प्रगती होते, आरोग्य सुदृढ होते.
twitterfacebookfacebook
share

(2 / 12)

मकर संक्रांतीसाठी उत्तम उपाय : असे मानले जाते की या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान केल्याने शनिदेव प्रसन्न होतो. तसेच यामुळे शनि, राहू-केतू यांच्या दोषातूनही मुक्ती मिळते आणि चांगला लाभ होतो, असे सांगितले जाते.
twitterfacebookfacebook
share

(3 / 12)

यज्ञाने मिळेल हा फायदा - मकर संक्रांतीच्या दिवशी घरी यज्ञ करा. गायत्री मंत्राचा १०८ वेळा जप करत करत तीळ अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये आनंद येतो. रोग दूर होतात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
twitterfacebookfacebook
share

(4 / 12)

सूर्याला जल अर्पण - मकर संक्रांत हा सूर्यदेवतेची पूजा करण्यासाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. पाण्यात लाल चंदन, लाल फुले, काळे तीळ आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यास आदर वाढतो. करिअर सूर्यासारखे चमकते.
twitterfacebookfacebook
share

(5 / 12)

सौभाग्याच्या वस्तू - मकरसंक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला हळदी-कुंकू समारंभ करतात. विवाहित स्त्रिया एकमेकांना हळद आणि कुंकू लावतात आणि सौभाग्याच्या साहित्याचे वाटप करतात. यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते.
twitterfacebookfacebook
share

(6 / 12)

या गोष्टी करा दान - मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ, घोंगडी, लाल वस्त्र, लाल मिठाई, शेंगदाणे, तांदूळ, मूग डाळ खिचडी, गूळ आणि काळी डाळ यांचे दान केल्यास शनि, राहू-केतू आणि सूर्य यांच्यापासून शुभ फल देते. माणूस श्रीमंत होतो.
twitterfacebookfacebook
share

(7 / 12)

पशु-पक्ष्यांची सेवा- या दिवशी गाईंना हिरवे गवत, मुंग्यांना साखर आणि पीठ, माशांना पिठाचे गोळे आणि पक्ष्यांना बाजरी खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे आपल्याकडे पैसा यायला लागतो.
twitterfacebookfacebook
share

(8 / 12)

काळे तीळ - मकर संक्रांतीच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांच्या डोक्यावरून मूठभर काळे तीळ घेऊन नजर उतरवून घ्या आणि उत्तर दिशेला फेकून द्या. याने आजार बरे होतात असे मानले जाते. तसेच, कर्जाच्या समस्यांपासून मुक्तीही मिळेल.
twitterfacebookfacebook
share

(9 / 12)

पितर वर्षभर प्रसन्न राहतील- मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांच्या नावाने नैवेद्य अर्पण करावा. श्राद्ध व तर्पण केल्यास पितर वर्षभर प्रसन्न राहतात. कुटुंबात वृद्धी होते. वैवाहिक जीवन आनंदी राहते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
twitterfacebookfacebook
share

(10 / 12)

तूपाचे सेवन व दान - मकर संक्रांतीच्या दिवशी तुपाचे सेवन आणि दान केल्याने कीर्ती आणि भौतिक सुख मिळते.
twitterfacebookfacebook
share

(11 / 12)

या वस्तू घरी आणा- मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे रोप, तांबे, सौभाग्याच्या वस्तू, तीळ, झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे प्रगती होते. तसेच, व्यवसायाचा विस्तार होतो असे मानले जाते. (डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
twitterfacebookfacebook
share

(12 / 12)

WhatsApp channel

इतर गॅलरीज