(1 / 8)यंदाच्या रक्षाबंधनाच्या सणात अनेक शुभ योगायोग घडत आहे. रक्षाबंधनाचा दिवस म्हणजे श्रावण पौर्णिमा होय. १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा ७ तास ३९ मिनिटे राहील. वैदिक दिनदर्शिकेनुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे केले जाते, रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर भद्राची छाया टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. राखी बांधण्यासाठी भद्रा व्यतिरिक्त इतर शुभ मुहूर्तांचा विचार करावा. भद्रा अशुभ असते, त्या काळात केलेल्या कामाचे चांगले फळ मिळत नाही, अशी धार्मिक धारणा आहे. जाणून घ्या राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे.