(1 / 6)ऑफिसच्या कामासाठी दिवसातील ९ ते १० तास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर घालवले जातात. तसेच, काही वेळ मोबाईलवरही जातो. अनेक लोक दिवसभर घरी आल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सिरीजव किंवा टीव्हीवरील बातम्या बघत बसतात. डोळे दिवसभर सतत काम करत असतील तर बिचार्या डोळ्यांना विश्रांती मिळायला नको का. आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये आपले डोळे निरोगी ठेवण्यासाठी काही सोप्या मार्गांवर एक नजर टाकूया. (Freepik)