
दिवाळी म्हणजे दिवे आणि गोडाधोडाचा सण. या उत्सवात लोक भरपूर फटाके फोडतात. आजूबाजूला फटाक्यांचा धूर असतो, त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. अशावेळी ‘या’ ५ टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या डोळ्यांचे रक्षण करू शकता.
दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून डोळ्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, फटाक्यांमध्ये गनपावडर आणि अनेक प्रकारचे हानिकारक पदार्थ असतात. त्याच्या धुरामुळे डोळ्यांची जळजळ, संसर्ग आणि इतर गंभीर समस्या उद्भवू शकतात.
फटाके जाळताना नेहमी सेफ्टी गॉगल घाला. हा गॉगल तुमच्या डोळ्यांचे धूर, रसायने आणि फटाक्यांच्या लहान तुकड्यांपासून संरक्षण करेल.
गरज नसल्यास फटाके जळत असलेल्या ठिकाणी जाणे टाळा. तुमचे डोळे संवेदनशील असतील, तर हा सण घरातच साजरा करा. धुराच्या जास्त संपर्कामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो.
दिवाळीच्या काही दिवस आधी लोक फटाके आणि बॉम्ब फोडायला सुरुवात करतात, त्यामुळे धूर आणि प्रदूषणाची समस्या आधीच सुरू होते. अशावेळी बाहेरून घरी आल्यावर डोळे पाण्याने धुवायला विसरू नका. जर, तुम्हीही दिवाळीत फटाके वाजवत असाल, तर घरी परतल्यावर डोळे थंड पाण्याने धुवा. त्यामुळे डोळ्यात साचलेली फटाक्यांची धूळ आणि घाण निघून जाईल.
दिवाळीपूर्वीच देशातील काही भागात प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत या काळात प्रदूषणात आणखी वाढ होणार हे नक्की. यामुळे डोळे कोरडे होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन आय ड्रॉप्स वापरू शकता. यामुळे तुमचे डोळे हायड्रेट राहतील आणि जळजळ कमी होईल.




