शनी आपल्या मुख्य त्रिकोण कुंभ राशीत वक्री होईल आणि गुरू ग्रह वृषभ राशीत वक्री दिशेने जाईल. दिवाळीच्या मुहूर्तावर या २ महत्त्वाच्या ग्रहांची उलट गती ३ राशीच्या लोकांसाठी सौभाग्य घेऊन येणार आहे. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात जोरदार प्रगती होणार आहे.
सिंह :
गुरू आणि शनीची वक्री गती सिंह राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ देऊ शकते. जे बेरोजगार होते त्यांना नोकरी मिळू शकते. नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. अविवाहित व्यक्तींचे लग्न होऊ शकते. आर्थिक लाभ होईल.
वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही ही दिवाळी खूप शुभ ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-सुविधा आणि ऐशोआराम वाढेल. पैसे मिळतील. नवीन वाहन, घर, मालमत्ता खरेदी करू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारी व्यवसाय फायदेशीर ठरेल.