गुगल पिक्सल ८: गुगल पिक्सल ८ फ्लिपकार्टच्या फेस्टिव्ह सेलसीझनमध्ये सर्वात लोकप्रिय फोनपैकी एक आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये हा फोन अवघ्या ३५ हजारांत खरेदी करू शकतात. गुगल पिक्सल ८ ची मूळ किंमत ७५ हजार ९९९ रुपये इतकी आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस २३: फ्लॅगशिप परफॉर्मन्स आणि दमदार कॅमेरा असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी गूड न्यूज आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस २३ बाजारात दाखल झाल्यापासून अनेकांची पसंती बनला आहे. हा ६.१ इंचाचा फोन लहान फ्लॅगशिप डिव्हाइस शोधणाऱ्या प्रत्येकासाठी एक चांगला पर्याय आहे.
आयक्यूओओ १२ 5G: गेमिंग फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आयक्यूओओ १२ 5G चांगला पर्याय आहे.कार्ड ऑफर्ससह हा फोन ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ३ एक्स टेलिफोटो लेन्स, एक वाइड लेन्स आणि अल्ट्रा-वाइड शूटरचा समावेश आहे.
आयफोन १३: आयफोन १३ एक जुने मॉडेल असू शकते, ज्यात ६० हर्ट्झ ओएलईडी पॅनेल आणि एआय वैशिष्ट्यांसह जुने हार्डवेअर समाविष्ट आहे. आयफोन १३ मध्ये सिनेमॅटिक व्हिडिओ मोडचा समावेश आणि ६० एफपीएसवर 4K व्हिडिओ शूट करण्याच्या क्षमतेमुळे कॅमेरा अद्याप व्हिडिओसाठी उत्कृष्ट आहे. १२ एमपी फ्रंट कॅमेरा 4K व्हिडिओला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे तो व्लॉगिंगसाठी एक चांगला पर्याय बनतो.सध्या हा फोन ४० हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे.