मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Baramati loksabha Election: बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप; अधिकारी केंद्राकडे रवाना; पाहा फोटो

Baramati loksabha Election: बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्याचे वाटप; अधिकारी केंद्राकडे रवाना; पाहा फोटो

May 06, 2024 11:57 AM IST Ninad Vijayrao Deshmukh

  • Baramati loksabha Election: जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदासंघाकरीता ७ मे रोजी मतदान होत आहे. मतदानाच्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आज मतदान यंत्रे आणि साहित्याचे वाटप निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. सर्व अधिकारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.

मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या अनुषंगाने साहित्याचे वाटप आज ६ मे रोजी करण्यात आले. दौंड विधानसभा मतदासंघाकरीता शासकीय धान्य गोदाम, मदर तेरेसा चौक, नगरमोरी दौंड, इंदापूर विधानसभा मतदारसंघाकरीता शासकीय धान्य गोदाम कालठण रोड, इंदापूर, बारामती विधानसभा मतदारसंघाकरीता महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळ परिसर, बारामती, पुरंदर विधानसभाकरीता श्री कातोबा हायस्कूल दिवे, भोर मतदारसंघात भोर तालुक्याकरीता औद्योगिक प्रशिक्षण संस्था भोर आणि वेल्हे तालुक्याकरीता जुनी पंचायत समिती, वेल्हे व जिल्हा परिषद मध्यवर्ती शाळा कुरण खुर्द, मुळशी तालुक्याकरीता राणी लक्ष्मीबाई सैनिकी मुलींची शाळा कासार आंबोली, आणि खडकवासला मतदारसंघाकरीता स्प्रिंग डेल प्ले ग्रांऊड वडगाव बु. ता. हवेली येथून वितरण करण्यात आले.  
twitterfacebookfacebook
share

(1 / 15)

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर  व खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. दौंड विधानसभा मतदासंघात ३ लाख ४ हजार ६०७, इंदापूर ३ लाख २३ हजार ५४१, बारामती  ३ लाख ६९ हजार २१७, पुरंदर ४ लाख २९ हजार ३५१, भोर ४ लाख ७ हजार ९२१ व खडकवासला ५ लाख ३८ हजार ३१ असे एकूण मतदार २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(2 / 15)

बारामती विधानसभा मतदारंसघात ३८० मतदान केंद्र, पुरंदर ४२१, इंदापूर ३३०, दौंड ३०९, भोर एकूण ५६१ व खडकवासला विधानसभा मतदारसंघात ४६५ मतदान केंद्र आहेत. ५ व ५ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले दौंड विधानसभा मतदारसंघात ६, इंदापूर ५, बारामती ६, पुरंदर १७, भोर ९ व खडकवासला ४४ असे एकूण ८७ मतदान केंद्रे आहेत.  
twitterfacebookfacebook
share

(3 / 15)

बारामती लोकसभा मतदासंघाअंतर्गत विधानसभा मतदारसंघनिहाय महिला, दिव्यांग, युवा, वैशिष्ट्यपूर्ण (युनिक) आणि आदर्श अशा मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून आवश्यक सुविधांनी युक्त ही मतदान केंद्रे मतदारांच्या स्वागतासाठी आणि मतदानासाठी सज्ज करण्यात आली आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(4 / 15)

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अशी वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रे निर्माण करण्यात आली असून महिला संचलित मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी, सुरक्षेसाठी नियुक्त पोलीस असे सर्वच महिला कर्मचारी आहेत. दिव्यांग संचलित मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी दिव्यांग आहेत. युवा संचलित मतदान केंद्रावर सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी युवा वयोगटातील आहेत. आदर्श मतदान केंद्रावर सर्व सेवासुविधा तसेच आवश्यक त्या अतिरिक्त सुविधा देण्यात येतात. युनिक मतदान केंद्रे ही वेगवेगळ्या संकल्पनेवर (थीम) सजविण्यात येणार आहेत. 
twitterfacebookfacebook
share

(5 / 15)

जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात बारामती लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी मावळ, पुणे व शिरुर मतदार संघात मतदान होत असून त्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रावर किमान आश्वासित तसेच अन्य सुविधांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
twitterfacebookfacebook
share

(6 / 15)

मतदान केंद्र २ किलोमीटरच्या परिसरात आणि तळमजल्यावर उभारण्यात आलेली आहे. शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार (पीडब्ल्यूडी), ज्येष्ठ मतदार यांना मतदानासाठी सुलभपणे जाता यावे यासाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(7 / 15)

मतदान केंद्रामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी, शारीरिकदृष्ट्या विकलांग मतदार, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक यांना बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात खुर्ची, बाकडे, टेबल आदी फर्निचरची व्यवस्था करण्यात आली आहे. 
twitterfacebookfacebook
share

(8 / 15)

मतदान केंद्रात पुरेशा प्रकाशासाठी विद्युतव्यवस्था करण्यात आली आहे. दुर्गम भागात वीजजोड नसल्यास त्या ठिकाणी बॅटरीचालित एलईडी, चार्जिंगचे दिवे आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केंद्रात उपलब्ध सुविधांबाबत माहिती दर्शविणारे चिन्हे (साईनेज) लावण्यात येतील.
twitterfacebookfacebook
share

(9 / 15)

उन्हाळा लक्षात घेता पिण्‍याच्या पाण्याची व्यवस्था आणि सावली नसल्यास मंडपाची व्यवस्था करण्यात येत आहे. महिला व पुरुषांसाठी पुरेशा पाण्याच्या उपलब्धतेसह स्वतंत्र शौचालये, महिला मतदारांसह आलेल्या बालकांसाठी पाळणाघरची सुविधा आहे. 
twitterfacebookfacebook
share

(10 / 15)

मतदारांना आपले मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादी भाग मधील अनुक्रमांक शोधण्यासाठी मदत करण्यास मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले मतदान मदत कक्ष उभारण्यात येणार आहेत.  
twitterfacebookfacebook
share

(11 / 15)

याशिवाय औषधोपचार किट, मतदान केंद्रावर शारीरिक विकलांग मतदार, ज्येष्ठ नागरिक मतदार यांना मदत करण्यासाठी तसेच केंद्रावरील रांगांचे व्यवस्थापनात सहाय्य करण्यासाठी स्वयंसेवक, ज्येष्ठ, दिव्यांग, हालचाल करण्यास अक्षम (लोकोमोटिव डिसेबल्स) आदींना मतदानाच्या दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवेचा मोफत पास देण्यात येईल. सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध नसल्यास त्यांना अन्य माध्यमातून घरुन मतदान केंद्रापर्यंत आणणे व मतदानानंतर घरी सोडण्याची व्यवस्था उपलब्ध केली जाईल. 
twitterfacebookfacebook
share

(12 / 15)

उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी १ हजार ७२४ प्रथमोपचार पेट्या आणि प्रत्येक मतदान केंद्रासाठी १० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण कृषी महाविद्यालय येथील वितरण केंद्रातून करण्यात आले.
twitterfacebookfacebook
share

(13 / 15)

मतदान केंद्रावर काही दुर्घटना उद्भवल्यास तात्काळ प्राथमिक उपचार देण्याच्या भारत निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत. त्याअनुषंगाने बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड विधानसभा मतदार संघासाठी २३२, इंदापूर २५२, बारामती २८०, पुरंदर २४४, भोर ५२५ व खडकवासला १९१ याप्रमाणे १ हजार ७२४ कीटचे वितरण करण्यात आले. तर २ हजार ५१६ मतदान केंद्राना २५१६० ओआरएसच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. 
twitterfacebookfacebook
share

(14 / 15)

प्रथमोपचार पेटीमध्ये बँडेज, कापूस, बीटाडाईन ट्यूब, अँटीसेप्टीक सोल्युशन, हातमोजे, पॅरासिटामॉल, रँनटीडीन टॅबलेट उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. किटचे वितरण सुलभतेने होण्यासाठी सर्व साहित्य असलेल्या प्रथमोपचार पेट्या पिशव्यांमध्ये भरुन पाठविण्यात आल्या. प्रत्येक पिशवीवर मतदारसंघाचे नाव लिहिण्यात आल्याने ती कीट मतदान केंद्रापर्यंत पोहोचविणे सोईचे होणार आहे. प्रथमोपचार साहित्य नेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वाहन व कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.  
twitterfacebookfacebook
share

(15 / 15)

IPL_Entry_Point

इतर गॅलरीज