बॉलिवूडमध्ये पूर्वी चित्रपटात केवळ अभिनेत्यांकडून ॲक्शन सीन्स केले जात असत, परंतु आज चित्रपटातील नायिका देखील ते अतिशय चांगल्या पद्धतीने धाकडपणा दाखवताना दिसतात. चला, आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या ॲक्शनमुळे तुम्ही अक्षय-सलमानला देखील विसरून जाल…
दिशा पाटणी : आपल्या जबरदस्त फिटनेससाठी प्रसिद्ध असलेल्या दिशा पाटणीचे नाव बॉलिवूडच्या ॲक्शन हिरोइन्समध्ये सामील होते. दिशा पाटणी नुकतीच ‘योद्धा’ या चित्रपटात जबरदस्त ॲक्शन सीन्स करताना दिसली होती.
कतरिना कैफ : कतरिना कैफ दिसायला जितकी सुंदर आहे आणि तितकीच ती अप्रतिम ॲक्शन सीन्स देखील करते, जी आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहिली आहे.
प्रियांका चोप्रा : प्रियांका चोप्राने बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या चित्रपटांमध्ये तिच्या ॲक्शन सीन्सनी सगळ्यांना भुरळ घातली आहे.
दीपिका पदुकोण : अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नावही बॉलिवूडच्या ॲक्शन हिरोइन्सच्या यादीत सामील आहे. दीपिका पदुकोणला आपण सर्वांनीच ‘जवान’ आणि ‘पठाण’मध्ये ॲक्शन करताना पाहिले आहे.
तापसी पन्नू : तापसी पन्नूने 'नाम शबाना' आणि 'बेबी' चित्रपटांमध्ये तिच्या जबरदस्त ॲक्शनने सर्वांना आश्चर्यचकित केले.