दिलजीत दोसांझचा दिल-लुमिनाटी इंडिया टूर खूप हिट ठरला आहे. या पंजाबी गायकाने देशाला त्याच्या तालावर खिळवून ठेवले. परंतु, केवळ त्याच्या परफॉर्मन्सनेच लोकांचे लक्ष वेधून घेतले नाही, तर त्याच्या फॅशन गेमने देखील त्याच्या या मैफिलींना चार चाँद लावले आहेत. याच वेळी त्याने एक असे जॅकेट परिधान केलेले ज्यावर सगळ्यांच्या नजरा होत्या.
दिलजीतने मुंबई कॉन्सर्टसाठी, सुपर कूल रेसर जॅकेट परिधान केले होते, जे सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, या जॅकेटची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारून जातील.
दिलजीतने त्याच्या या डॅपर लुकसाठी लक्झरी लेबल 'बॅलेन्सियागा'च्या लिमिटेड पीस असलेल्या रेसर जॅकेटची निवड केली होती. हे जॅकेट मोठ्या आकाराचे अर्थात बॅगी फिट आहे. तर, या जॅकेटला लेदर टेक्सचर आहे. त्यात स्कफ फिनिश आणि सॅटिन अस्तर आहे. निऑन आणि ब्लॅक कलर-ब्लॉकिंग असा खास लूक या जॅकेटच्या सौंदर्याला एन वेगळा आयाम देत होता.
आता जर तुम्हालाही त्याचं हे जॅकेट आवडलं असेल आणि त्याची किंमत जाणून घेण्यास उत्सुक असाल, तर आम्ही तुम्हाला यांची किंमत सांगणार आहोत. या जॅकेटची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसू शकतो.