Diljit Dosanjh Movies : सध्या सोशल मीडियावर दिलजित दोसांझच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, त्याने गाण्यांतूनच नव्हे, चित्रपटांतूनही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कुठे बघाल त्याचे गाजलेले चित्रपट?
(1 / 8)
दिलजित दोसांझच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. दिलजत दोसांझ जितका उत्तम अभिनेता आहे तितकाच तो चांगला गायकही आहे. दिलजित दोसांझचे सर्वाधिक रेटिंग मिळवलेले चित्रपट कोणते आहेत, जाणून घेऊया…
(2 / 8)
दिलजित दोसांझचा ‘पंजाब १९८४’ हा चित्रपट २०१४साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट पंजाबी भाषेतील पीरियड ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ८.३ आहे. हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
(3 / 8)
‘अमर सिंह चमकीला’ हा चित्रपट या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दिलजितसोबत परिणीती चोप्राही दिसली होती. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.८ आहे.
(4 / 8)
२०१६मध्ये रिलीज झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात दिलजित दोसांझने पोलिसाची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.७ आहे. हा चित्रपट तुम्ही युट्यूबवर पाहू शकता.
(5 / 8)
‘जट अँड ज्युलिएट’ हा २०१२ साली प्रदर्शित झालेला पंजाबी रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.५ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
(6 / 8)
‘जट अँड ज्युलिएट २’ हा चित्रपट २०१३मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.३ आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
(7 / 8)
‘सूरमा’ हा २०१८ साली प्रदर्शित झालेला स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.३ आहे. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहू शकता.
(8 / 8)
२०११साली प्रदर्शित झालेला ‘जिने मेरा दिल लुटिया’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.४ आहे. हा चित्रपट तुम्ही झी५वर चित्रपट पाहू शकता.