(2 / 4)तेजश्री प्रधान ही एक उत्तम अभिनेत्री आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र, तिला एक सख्खी बहीण असून, ती देखील तेजश्री इतकेच सुंदर आहे, हे फार कमी लोकांना माहीत असेल. तेजश्री प्रधान हिने आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवली. तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले. ‘होणार सून मी ह्या घरची मधली’ जान्हवी असो, किंवा ‘अग्गंबाई सासुबाई’मधील शुभ्रा ते आता ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ता...तिच्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं. सोशल मीडियावर सक्रिय असणारी तेजश्री प्रधान आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मात्र काही गोष्टी खाजगी ठेवणच पसंत करते.