मराठी तसेच बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकर ओळखली जाते. तिचा प्रत्येक चित्रपट हा हिट होताना दिसतो. काही दिवसांपूर्वीच अमृताने ओटीटी विश्वात पदार्पण केले. अमृताचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात.
नुकताच अमृताच्या मोठ्या बहिणाचा फोटो समोर आला आहे. स्वत: अमृताने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अमृताने बहिणीसोबतच फोटो शेअर करत हॅशटॅगचा वापर केला आहे. हा हॅशटॅग वापरत तिने सिबलिंग डे असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो चर्चेत आहेत.