
आजकाल मधुमेह ही एक सामान्य समस्या बनली आहे. जी लाखो लोकांना प्रभावित करते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्या आहारात काही विशेष बदल करणे आवश्यक आहे.
(freepik)वेलचीचे फायदे-
वेलचीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याच्या सेवनाने इन्सुलिनची पातळी सुधारते आणि शरीरातील साखर शोषून घेण्याची प्रक्रिया सुधारते.
वेलचीचे पाणी- 2-3 वेलचीच्या दाणे पाण्यात उकळून रोज सकाळी प्या. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि दिवसभर ताजेपणा मिळतो.
वेलची पावडर-वेलची बारीक करून त्याची पावडर बनवा आणि ती चहा किंवा दुधात घालून सेवन करा. चव वाढवण्यासोबतच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत होते.


