वसंत पंचमीच्या दिवशी त्रिवेणी संगमावर अमृतस्नान करण्यासाठी नागा साधुंचे गंगा-यमुनेच्या संगमावर नदी किनारी असे आगमन झाले.
(AFP)कुंभमेळ्यात नागा साधुंच्या आगमनानंतरच अमृत स्नानाला सुरूवात केली जाते. आजचे स्नान हे या कुंभमेळ्यातील तिसरे आणि शेवटचे अमृत स्नान (शाही स्नान) आहे. पहाटे तीन वाजेपासूनच विविध आखाड्यातील साधुंनी गंगेत डुंबकी लावून स्नान केले. संपूर्ण नदीकिनारी यावेळी ‘हर हर गंगे’, आणि ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी दुमदुमत होता.
(AFP)कुंभमेळ्यात वसंत पंचमीच्या दिवशीच्या शाही स्नान सोहळ्यात अनेक महिलाही सहभागी झाल्या होत्या. शाही स्नानानंतर गंगा-यमुनेच्या किनारी साडी सुकवण्यासाठी साडीचा पदर पकडून उभी असलेली महिला या छायाचित्रात दिसत आहे.
(AFP)प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात येणाऱ्या यात्रेकरूंच्या स्नान करण्यासाठी नदीच्या आत जाण्यासाठी प्रशासनाकडून असे तरंगते पूल तयार करण्यात आले आहे. या पुलांना पांटुन पूल असेही म्हणतात. रिकामे सिलेंडर एकमेकांना बांधून, त्यावरून रस्ता तयार करून हे तरंगते पूल बांधले गेले आहे. याला स्थानिक भाषेत ‘पिपे के पूल’ असंही म्हटलं जातं. या पुलांची सतत देखरेख करणे आवश्यक असते. कुंभमेळ्यात असे एकूण ३० पांटुन पूल तयार करण्यात आले आहे.
(PTI)उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात साधुंचे एकूण १३ आखाडे आहे. प्रत्येक आखाड्याचे वैशिष्ट्य वेगळे आहे. सनातन धर्मातील विविध संप्रदायांचे ते प्रतिनिधीत्व हे आखाडे करत असतात. यात ढोबळ मानाने तीन आखाडे १) शैव २) वैष्णव आणि ३)उदासिन आखाडे असतात. प्रत्येक आखाड्याची परंपरा, नेतृत्वाची रचना, विधीची पद्धती वेगवेगळी असते.
(PTI)प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेच्या संगमावर होणाऱ्या शाही स्नानाच्या वेळी उत्तर प्रदेश सरकारकडून भक्तांवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येत असते. वसंत पंचमीच्या स्नानाच्या दिवशी पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी स्नान करणाऱ्या यात्रेकरूंकडून हर हर महादेवच्या घोषणा देण्यात आल्या.
(@myogiadityanath)कुंभमेळ्यात सामील झालेल्या १३ आखाड्यांपैकी प्रत्येक आखाड्याचे एक वैशिष्ट्य असते. जुना आखाडा हा साधुंचा आखाडा आहे. तर निर्मोही आखाड्याचे सदस्य विष्णूला मानणारे असून ते वैष्णव परंपरेचं पालन करतात. महानिर्वाणी आखाड्याचे साधु हट योगाचे पालन करतात. तर उदासिन आखाड्याचे साधु हे हिंदू आणि शीख यांच्या संमिश्र परंपरेचं पालन करतात. आणि जीवनातील कोणत्याही मोहमायापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.
(PTI)कुंभ मेळ्यात अनेक भाविक सहकुटुंब सामील झाले आहेत. या धार्मिक उत्सवात बाळगोपाळांच्या मौजमज्जेसाठी करमणुकीची विविध साधने उपलब्ध करून देण्यात आली आहे. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी येथे विविध प्रकारच्या राइड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यात बोट फेरी, लेझर शोचे आयोजन करण्यात येत आहे. कुंभमेळ्याच उंटावर बसून गंगा नदीकिनारी फेरफटका मारताना बच्चे कंपनी या फोटोत दिसत आहे.
धार्मिक शास्त्रांनुसार कुंभमेळ्यात स्नान केल्याने आत्मशुद्धी होते आणि मोक्ष प्राप्ती होते. महाकुंभमध्ये चालू फेब्रुवारी महिन्यात तीन महत्वाचे दिवस आहेत. आज, सोमवार वसंत पंचमी हा शाही स्नान करण्याचा दिवस मानला जातो. त्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेचा दिवस पवित्र दिन मानला जातो. महाकुंभची अखेर ही २६ जुलै रोजी महाशिवरात्रीरोजी होणार आहे.
(PTI)