प्रत्येकाला आनंदी शेवट आवडतो, मग तो खऱ्या आयुष्यात असो किंवा चित्रपटात. पण प्रत्येक वेळी कथेचा शेवट चांगलाच असेल असे नाही. बॉलीवूडचे असे अनेक चित्रपट आहेत, ज्यामध्ये सुरुवातीला खूप प्रेम पाहायला मिळेल, पण शेवट खूप वेदनादायक होता. हे चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपले अश्रू अनावर होतील. आज आम्ही तुम्हाला अशाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही OTT वर पाहू शकता.
सनम तेरी कसम हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. त्याची कथा अगदी साधी असली तरी ती प्रेक्षकांना खूप आवडली होती. या प्रेमकथेच्या चित्रपटाचा शेवट सगळ्यांना रडवणारा होता. हा चित्रपट तुम्ही जिओ सिनेमा आणि झी ५ वर पाहू शकता.
आशिकी चित्रपटाच्या रिमेकचा म्हणजेच आशिकी 2 चा शेवट खूपच भावनिक आहे. हा चित्रपट तुम्हाला प्रेयसीबद्दल विचार करायला लावतो. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा दु:खद शेवट प्रेक्षकांना आतून हादरवून सोडले होते. तुम्ही प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट पाहू शकता.
बनारसच्या गल्ल्यांपासून रांझना या चित्रपटाची प्रेमकथा कुठे सुरू होते आणि कुठे संपते याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. यामध्ये एक ब्राह्मण मुलगा एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडतो, जिच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. चित्रपटाचा शेवट पाहून तुम्हालाही नक्कीच रडू येईल. हा चित्रपट जिओ सिनेमा, झी ५ आणि प्राइम व्हिडीओवर आहे.
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा त्याच्या चाहत्यांच्या मनाच्या खूप जवळ आहे. चित्रपटात सुशांत आणि संजना संघी एका आजारातून जात आहेत. यामुळे चित्रपटात सुशांतचा मृत्यू होतो. या चित्रपटाचा शेवट खूप दुःखद आहे. तुम्ही ते डिस्ने हॉटस्टारवर पाहू शकता.
एका प्रसिद्ध कादंबरीवर आधारित देवदास हा चित्रपट सर्वांच्या आवडत्या चित्रपटांच्या यादीमधील एक आहे. या चित्रपटात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात देव त्याची मैत्रीण पारोच्या प्रेमात स्वतःला उद्ध्वस्त करतो. चित्रपटाचा शेवट सर्वांना रडवो. हा चित्रपट जिओ सिनेमावर, झी ५ आणि प्राईमवर प्रदर्शित झालेला आहे.
या यादीत सलमान खान स्टारर तेरे नाम चित्रपटाचा देखील समावेश आहे. या चित्रपटात सलमान खान भूमिका चावलाच्या प्रेमात वेडा झाला आहे. चित्रपटाचा शेवट पाहिल्यानंतर तुमचे अश्रू अनावर होतील. हा चित्रपट जिओ सिनेमा, झी ५ आणि प्राइम व्हिडीओवर आहे.