Saif Ali Khan Movies: जान्हवी कपूरचा ‘देवारा पार्ट १’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
(1 / 6)
सैफ अली खान लवकरच मोठ्या पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ ‘देवारा पार्ट १’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सैफ मोठ्या पडद्यावर खलनायक बनला आहे. सैफ अली खानचे हे चित्रपट तुम्ही पाहिले आहेत का?
(2 / 6)
‘ओंकारा’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता. या चित्रपटात सैफ अली खानला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. या चित्रपटात सैफने 'लंगडा त्यागी' नावाच्या खलनायकाची भूमिका साकारली होती.
(3 / 6)
सैफचा ‘लाल कप्तान’ हा चित्रपट २०१९मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.२ होते. या चित्रपटात सैफने गोसाई नावाच्या शिकारीची भूमिका साकारली होती.
(4 / 6)
‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात सैफ अली खानने उदयभान सिंहची भूमिका साकारली होती. या चित्रपटात सैफ अलीसोबत अजय देवगण दिसला होता. या चित्रपटाचे आयएमडीबी रेटिंग ७.५ आहे.
(5 / 6)
२००९मध्ये रिलीज झालेल्या ‘कुर्बान’ या चित्रपटात करीना कपूर, सैफ अली खानसोबत दिसली होती. या चित्रपटात सैफने दहशतवाद्याची भूमिका साकारली होती.
(6 / 6)
गेल्या वर्षी ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर बरीच टीका झाली होती. मात्र, या चित्रपटात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारताना दिसला होता. या चित्रपटात सैफ अली खानचा लूक खूपच वेगळा होता.