Devara Part 1: जान्हवी कपूरचा पहिला तेलगू चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान देखील दिसणार आहे. या चित्रपटासाठी कोणाला किती मानधन मिळाले चला जाणून घेऊया...
(1 / 7)
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'देवरा पार्ट 1' या चित्रपटाचा ट्रेलर मंगळवारी रिलीज झाला आहे. या चित्रपटात जान्हवी आरआरआर अभिनेता ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
(2 / 7)
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दमदार ॲक्शनची झलक पाहायला मिळाली आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कोणी किती मानधन मिळाले हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.
(3 / 7)
फिल्मीबीटच्या रिपोर्टनुसार, जान्हवी कपूरने या चित्रपटासाठी ४ ते ५ कोटी रुपये फी आकारली आहे. जान्हवी कपूरचा हा पहिला तेलगू चित्रपट असेल.
(4 / 7)
RRR या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणाऱ्या ज्युनियर एनटीआरने या चित्रपटासाठी ४५ ते ६० कोटी रुपये घेतले आहेत.
(5 / 7)
या चित्रपटात सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी सैफ अली खानने १० कोटी रुपये घेतले आहेत.
(6 / 7)
मुरली शर्मा हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. देवरा पार्ट 1 मध्ये मुरली शर्मा देखील दिसणार आहे. या चित्रपटासाठी त्याला ४० लाख रुपये देण्यात आले आहेत.
(7 / 7)
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रकाश राज यांनी या चित्रपटासाठी दीड कोटी रुपये घेतले आहेत.