कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी देवतांनी दीप प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली होती. म्हणून या दिवसाला देव दिवाळी म्हणतात.
कार्तिक अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. तर, देव दिवाळी कार्तिक पौर्णिमेला साजरी केली जाते, जी यावर्षी १५ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. यासोबतच या दिवशी काही खास उपाय केल्याने आर्थिक समस्याही दूर होतात.
दिवाळीत लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी घराचे मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करावे, कमान बसवावी, रांगोळ्या काढाव्या आणि गंगेच्या पाण्यात हळद घालून ती सर्वत्र शिंपडावी. तसेच, सायंकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचे दिवे लावावे. या उपायाने घरात लक्ष्मीचे आगमन होईल आणि आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल.
(pixabay)