देव आनंद आणि झीनत अमान यांचा 'हरे रामा हरे कृष्णा' हा चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. केवळ चित्रपटच नाही तर त्यातील गाणीही खूप गाजली होती.
(1 / 6)
देव आनंद आणि झीनत अमान यांचा 'हरे रामा हरे कृष्णा' हा चित्रपट १९७१ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. केवळ चित्रपटच नाही तर त्यातील गाणीही खूप गाजली होती.
(2 / 6)
आजही या चित्रपटाची गाणी लोकांच्या ओठावर आहेत. या चित्रपटातील लोक रक्षाबंधनाला 'फूलों का तारों का' गाणे गातात आणि पार्ट्यांमध्ये 'दम मारो दम' हे गाणे वाजवतात.
(3 / 6)
पण त्याकाळात सरकारने 'दम मारो दम' गाण्यावर बंदी घालती होती. आता या गाण्यावर बंदी घालण्यामागचे काय आहे कारण? असा प्रश्न सर्वांना पडला असेल.
(4 / 6)
दिवंगत संगीत दिग्दर्शक आरडी बर्मन आणि लेखक आनंद बक्षी यांनी एका मुलाखतीत या गाण्याचा किस्सा सांगितला होता.
(5 / 6)
आर.डी.बर्मन आणि आनंद बक्षी यांनी सांगितले होते की, “गाण्यात 'भगवान राम'चे नाव 'दम'शी जोडण्यास तत्कालीन सरकारने आक्षेप घेतला होता, त्यामुळे सुरुवातीला आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ) आणि डीडीवर या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती.”
(6 / 6)
या गाण्यामुळे देशात हिप्पी संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वासही सरकारला वाटत होता.
(7 / 6)
निर्मात्यांनी या गाण्याविरोधात खूप संघर्ष केला. नंतर 'हे' गाणे सेम टू सेम तेच लिरिक्ससह रिलीज झाले.