पश्चिम दिल्लीच्या मुंडका इथल्या एका तीन मजली इमारतीत आग लागली होती. या आगीत किमान २७ जणांचा मृत्यू झाला तर ५० लोकांना आगीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
(1 / 8)
देशाच्या राजधानीतल्या एका भयानक आगीत किमान २७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली मुंडका भागातली ही इमारत.(HT Photo)
(2 / 8)
आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या इमारतीत एक कार शोरुम आणि ऑफीसची जागा होती. ही इमारत दिल्लीच्या मुंडका मेट्रो स्थानकाजवळ आहे.(Sanchit Khanna/Hindustan Times)
(3 / 8)
अग्निशमन दलाचे जवान आणि एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्याला सुरुवात केली. आगीत जळून खाक झालेली ही इमारत.(Raj K Raj/Hindustan Times)
(4 / 8)
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या इमारतीतनं ५० लोकांचा जीव वाचवण्यात यश आलंय. तर २७ लोकांनी आपला जीव गमावलाय.१२ लोकांना गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत.(Raj K Raj/Hindustan Times)
(5 / 8)
पहिल्या मजल्यावरच्या सीसीटिव्ही आणि वायफाय राऊटर बनवणाऱ्या एका कंपनीत ही आग सर्वात आधी भडकली असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.(Raj K Raj/Hindustan Times)
(6 / 8)
अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी अतुल गर्ग यांच्या म्हणण्यानुसार या इमारतीकडे अग्निसुरक्षेसंदर्भातलं कोणतंही प्रमाणपत्र नव्हतं. (Raj K Raj/Hindustan Times)
(7 / 8)
मुंडका परिसरातल्या या इमारतीची आग ही २०१९ रोजी अंज मंडी इथं लागलेल्या आगीनंतरची सर्वात भीषण आग आहे.त्या आगीत ४३ जणांनी आपला जीव गमावला होता.(Raj K Raj/Hindustan Times)
(8 / 8)
ही इमारत मालकीची असलेल्या दोघांना रात्री उशीरा अटक करण्यात आलीय.हर्ष गोएल आणि वरुण गोएल अशी या दोघांची नावं आहेत. (Raj K Raj/Hindustan Times)