मुंबई-दिल्ली प्रवास आता फक्त १२ तासांत.. पंतप्रधान मोदी करणार Delhi Mumbai expressway चे उद्घाटन
Delhi-Mumbai Expressway: दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर प्रवास करण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे. या भव्य व आधुनिक एक्सप्रेस वेवरील पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ फेब्रुवारी रोजी लोकार्पण करणार आहेत. उद्यापासून या एक्सप्रेस वे वरून दिल्ली ते जयपूर दरम्यान वाहतूक सुरू होईल.
(1 / 6)
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे मोदी सरकारचा एक महत्वाकांक्षी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी लोकार्पण होत आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या २४६ किलोमीटर लांब दिल्ली-दौसा-लालसोट या पहिल्या टप्प्यासाठी १२,१५० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
(2 / 6)
दिल्ली-मुंबई महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा एक्स्प्रेस वे देशातील सर्वात लांब व भव्य एक्स्प्रेस वे असेल. ज्याची लांबी १,३८६ किमी असेल. हे काम पूर्णपणे तयार झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हे अंतर १,२४२ किमी होईल, जे आता १४२४ किमी आहे.
(3 / 6)
त्याचबरोबर प्रवासाचा वेळ देखील २४ तासांवरून १२ तासांपर्यंत कमी होईल, म्हणजेच हा वेळ जवळजवळ निम्मा होईल. दिल्ली आणि मंबई एक्सप्रेस वे चे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे या संपूर्ण एक्सप्रेस वे वर कोठेही टोल नाके लावलेले नाहीत. त्यामुळे प्रवास करताना प्रवाशांना वेळोवेळी टोल देण्यासाठी थांबावे लागणार नाही.
(4 / 6)
हा एक्सप्रेस वे सहा राज्यांतून दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाईल आणि कोटा, इंदौर, जयपूर, भोपाळ, बडोदा आणि सूरत सारख्या प्रमुख शहरांना जोडेल. हा एक्सप्रेस वे ९३ पीएम गति शक्ति आर्थिक नोड्स, १३ बंदरे, ८ प्रमुख विमानतळे आणि मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्कसोबतच जेवर विमानतळ, नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदरालाही सेवा पुरवेल.
(5 / 6)
या मार्गावर चढ व उतारावर इंटरचेंज टोल लावण्यात आले आहेत. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे पर प्रवास शुल्क किलोमीटरच्या संख्येवरून घेतला जाईल.
(6 / 6)
प्रत्येक ५० किलोमीटरवर एंट्री आणि एक्झिट गेट आहेत तेथे ऑटोमॅटिकली टोल कट होईल. या एक्सप्रेस वे वर दिल्ली आणि जयपूर मार्गावर ५ इंटरचेंज असतील आणि हा महामार्ग ८ पदरी असून लवकरच १२ पदरी केली जाईल. एक्सप्रेसवेची हाय स्पीड लिमिट १२० किलोमीटर प्रतितास आहे.
इतर गॅलरीज