GT vs DC IPL 2023 : अहमदाबादेत झालेल्या थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा पाच धावांनी पराभव केला आहे.
(AFP)दिल्लीने गुजरातला १३१ धावांचं लक्ष्य दिलं होतं, गुजरातला २० षटकांत १२५ धावा करता आल्या. अखेरच्या षटकात खलील अहमदने राहुल तेवतियाला बाद करत एकहाती सामना फिरवला.
(IPL Twitter)प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने अक्षर पटेल, रिपल पटेल आणि अमन खान यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर गुजरातला १३० धावांचं लक्ष्य दिलं होतं.
(Delhi Capitals Twitter)दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरातचा डाव पहिल्या पाच षटकांतच गडगडला. चार गडी एकेरी धावांवर बाद झाल्यानंतर हार्दिक पटेल आणि अभिषेक मनोहर यांनी खिंड लढवली.
(IPL Twitter)हार्दिक पांड्या आणि राहुल तेवतिया यांनी फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ नेलं. परंतु अखेरच्या षटकात १२ धावांची गरज असताना पांड्या आणि राशिदला केवळ सात धावा करता आल्या.
(IPL Twitter)