Defence Minister Rajnath Singh visits Siachen Glacier: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या युद्धभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी सैनिकांशी संवाद देखील साधला. सियाचीनमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या जवानांच्या "फौलादी" इच्छाशक्तीचे त्यांनी कौतुक केले.
(1 / 8)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जगातील सर्वात उंच असलेल्या युद्ध भूमी सियाचीन, लडाखला भेट दिली. उणे शून्यापेक्षा कमी तापमानात मातृभूमिचे संरक्षण करणाऱ्या जवणांशी त्यांनी संवाद साधला. (X/@rajnathsingh)
(2 / 8)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी जगातील सर्वात उंच बर्फाच्छादित युद्धभूमी असलेल्या सियाचिन येथील सुरक्षा स्थितीचा प्रत्यक्ष जाऊन आढावा घेतला. ऑपरेशन मेघदूत अंतर्गत हा प्रदेश भारतात समाविष्ट करून घेण्यात आला होता. (X/@SpokespersonMoD)
(3 / 8)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सियाचीन आणि लडाख येथे तैनात असलेल्या लष्कराच्या जवानांना संबोधित केले. येथील जवानांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी त्यांचा उत्साह आणि मोनोबल वाढवले. (X/@SpokespersonMoD)
(4 / 8)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीन बेस कॅम्पच्या भेटीदरम्यान हुतात्मा स्मारकावर कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या शूरवीरांना पुष्पहार अर्पण केला आणि श्रद्धांजली वाहिली.(X/@@SpokespersonMoD)
(5 / 8)
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सियाचीनचे वर्णन भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे, असे केले. (X/@rajnathsingh)
(6 / 8)
'ऑपरेशन मेघदूत' नंतर भारतीय सैन्याने सामरिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या सियाचीन प्रदेश ताब्यात घेण्याच्या घटनेला नुकतेच ४० वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त त्यांनी येथे भेट दिली. (ANI )
(7 / 8)
राजनाथ सिंह म्हणाले की ज्याप्रमाणे दिल्ली भारताची राष्ट्रीय राजधानी आहे, मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि बंगळुरू ही तंत्रज्ञानाची राजधानी आहे, सियाचीन ही "धैर्य, धैर्य आणि दृढनिश्चयाची राजधानी आहे. (ANI )
(8 / 8)
काराकोरम पर्वतरांगेतील सियाचीन हिमनदी हे जगातील सर्वात उंचावरील लष्करी क्षेत्र म्हणून ओळखले जाते जेथे सैनिकांना हिमबाधा आणि थंड वारे आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. या स्थितीत भारतीय सैनिक या प्रदेशाचे शत्रूपासून रक्षण करत आहेत. (ANI )