बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची डिलिव्हरी डेट जवळ आली आहे. अभिनेत्री पहिल्यांदाच आई होणार आहे. चाहत्यांना आनंदाची बातमी देण्याआधी दीपिकाने प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दीपिका पदुकोण तिचा पती रणवीर सिंगसोबत दिसत आहे.
दीपिका पदुकोणने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे मॅटरनिटी फोटोशूट शेअर केले आहे. हे फोटो शेअर करत तिने इव्हिल आय, हार्ट आणि आनंदी असल्याचे इमोजी वापरले आहेत. पहिल्या फोटोमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग एकमेकांच्या अगदी जवळ दिसत असून त्यांचे स्मित हास्य पाहण्यासारखे आहे.
या फोटोंमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण रोमँटिक मूडमध्ये दिसत आहेत. रणवीरने दीपिकाच्या पोटावर हात ठेवला आहे. आत्तापर्यंत तिचा बेबी बंप फक्त कल्की 2898 एडी या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी दिसत होता.