
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण नुकतीच 'फायटर' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान स्पॉट झाली होती. यावेळी तिच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी दीपिका पदुकोणचा लूक पाहण्यासारखा होता. पाहा फोटो…
या फोटोंमध्ये दीपिका पदुकोणची सुंदर विंटर फॅशन स्टाईल पाहून सगळेच तिचे कौतुक करताना दिसले आहेत.
दीपिका पदुकोणच्या लूकबद्दल बोलायचे तर, ती पांढऱ्या शर्टवर हाफ स्लीव्ह स्वेटर आणि ट्राउजरमध्ये खूपच स्टायलिश दिसत होती.
यावेळी स्मोकी मेकअपसह मोकळ्या केसांच्या हेअरस्टाईलमध्ये दीपिका पदुकोणने सगळ्यांनाच घायाळ केलं आहे.
अभिनेत्री दीपिका पदुकोणने या लूकसोबत कमीत कमी ॲक्सेसरीज परिधान केल्या होत्या. यासोबत हाय हिल्स परिधान करून तिने तिचा हा लूक पूर्ण केला होता.
दीपिका पदुकोणचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत, जे तिच्या प्रत्येक लूकवर भरभरून लाईक्स आणि कमेंट करताना दिसतात.




