डिसेंबर महिन्यात आलिया भट्ट, प्रतीक गांधी, बॉबी देओल यांच्यासह अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. डिसेंबरमध्ये येणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजविषयी चला जाणून घेऊया…
आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांचा चित्रपट 'जिगरा' चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई केल्यानंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 123 तेलुगुच्या रिपोर्टनुसार, हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर धडकणार आहे.
शिवकार्तिकेयन आणि साई पल्लवी यांचा 'अमरन' चित्रपट 11 डिसेंबरपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 28 दिवसांनी OTT वर प्रदर्शित होणार आहे.
रोहित सराफ आणि प्राजक्ता कोळी यांच्या 'मिसमॅच्ड' मालिकेचा तिसरा सीझन १३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.
अजय देवगण आणि रोहित शेट्टीचा ॲक्शन ड्रामा चित्रपट 'सिंघम अगेन' 1 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आता 27 डिसेंबर रोजी मेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे