उत्तर भारतातही दक्षिणेतील चित्रपटांची क्रेझ वाढली आहे. डिसेंबर महिन्यात साऊथचे सात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील काही चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहेत. वाचा पूर्ण यादी…
अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाचा भाग २ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
बॅरोज चित्रपटाचे दिग्दर्शन मोहनलाल यांनी केले आहे. हा चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ॲक्शन, साहस आणि काल्पनिकतेवर आधारीत आहे.
उन्नी मुकुंदनचा मार्को २० डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल.
उपेंद्रचा चित्रपट UI २० डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट असेल.
रॉबिनहूडमध्ये नितीन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा एक ॲक्शन, क्राईम थ्रिलर चित्रपट असेल. हा चित्रपट फक्त तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
मॅजिक चित्रपटात सारा अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू आणि तामिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.