Iran twin blasts: इराणमध्ये अवघ्या १५ मिनिटांत दोन भीषण स्फोट झाले.
(1 / 4)
इराणच्या केरमन शहरात बुधवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोटात १०३ जण ठार झाले. तर, १४१ जण जखमी झाले आहेत. बीबीसीने इराणच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले.
(2 / 4)
माजी रिव्होल्युशनरी गार्ड्स जनरल कासिम सुलेमानी यांच्या समाधीवर हे स्फोट झाले. हा आत्मघाती हल्ला होता. त्याची पडताळणी केली जात आहे, अशी पोलिसांनी माहिती दिली.
(3 / 4)
केरमनमधील स्थानिक मीडियाने अल अरेबिया टीव्हीला सांगितले की, बुधवारी पहिला स्फोट सुटकेसमध्ये ठेवलेल्या बॉम्बमुळे झाला.
(4 / 4)
दोन्ही स्फोटांमध्ये १० ते १५ सेकंदाचे अंतर होते. पहिला स्फोट सुलेमानी यांच्या थडग्यापासून ७०० मीटर अंतरावर झाला. दुसरा स्फोट सुरक्षा चौकीजवळ झाला.