(1 / 7)आयपीएल २०२४ च्या ३५ व्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी जोरदार फटकेबाजी केली. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची धुलाई करताना हेडने केवळ ३२ चेंडूत ८९ धावांची स्फोटक खेळी खेळली. तर अभिषेकने १२ चेंडूत ८ चौकार लगावत ४६ धावा केल्या. हैदराबादने पॉवरप्लेमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे.