David Warner Last Test Match : दिग्गज क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा आज (६ जानेवारी) शेवट झाला. त्याने पाकिस्तानविरुद्ध करिअरचा शेवटचा कसोटी सामना खेळला. शेवटच्या डावात वॉर्नरने अर्धशतक केले.
(1 / 6)
डेव्हिड वॉर्नरने आपल्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी पाकिस्तानविरुद्ध सिडनीच्या सिडनी क्रिकेट मैदानावर खेळली. कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीच्या दोन्ही डावांत वॉर्नरने अनुक्रमे ३४ आणि ५७ धावा केल्या.(AFP)
(2 / 6)
करिअरच्या शेवटच्या कसोटीनंतर वॉर्नरने आपल्या कुटुंबाबद्दल अतिशय भावनिक वक्तव्य केले. ऑस्ट्रेलियन वॉर्नरने त्याचा भाऊ आणि त्याच्या पत्नीला आपल्या यशाचे श्रेय दिले.(AFP)
(3 / 6)
सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर वॉर्नरला चाहत्यांकडून भव्य निरोप मिळाला. यादरम्यान त्याची पत्नी कँडिसही मैदानावर उपस्थित होती.(AFP)
(4 / 6)
शेवटच्या कसोटीनंतर वॉर्नर म्हणाला, "कुटुंब हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही त्यांच्याशिवाय काहीच करू शकत नाही. माझ्या उत्कृष्ट संगोपनाचे श्रेय मी माझ्या पालकांना देतो."
(5 / 6)
ऑस्ट्रेलियन फलंदाज आपल्या भावाबद्दल म्हणाला, "माझ्या यशाचे श्रेय माझ्या भावालाही जाते, त्याच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी पुढे आलो."
(6 / 6)
वॉर्नर पुढे म्हणाला, "आता मी जास्त काही सांगू शकणार नाही कारण मी भावूक होत आहे. धन्यवाद कँडिस. माझ्यासाठी तूच माझे जग आहेस."