मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.
श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जातात. दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या मठात ७ दिवसीय श्री गुरुचरित्र पारायण, यज्ञ नाम-जप असा दत्त सप्ताह साजरा केला जातो. यावेळी प्रहरही केले जातात.
दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ मठात दत्तांचा पाळणा सजवण्यात आला. शेवंतीचे पांढरे फुले आणि झेंडूच्या केशरी, पिवळ्या फुलांनी हा पाळणा आकर्षक दिसतोय.
यावेळी लहान मुलांनी दत्तात्रय, श्री स्वामी समर्थ, गुरुमाऊली, मोरेदादा यांचा वेश परिधान केला होता. तर लहान मुलींनी पारंपारिक वेशभुषा परिधान केली होती.