सनातन धर्मात होळी सणाचा मोठा उत्साह असतो. या सणाच्या आठ दिवस आधी होळाष्टक सुरू होते. या काळात शुभ कर्मे निषिद्ध मानली जातात. यावर्षी होलिका दहन रविवार, २४ मार्च २०२४ रोजी होणार आहे. तर १७ मार्चपासून होलाष्टक सुरू होणार आहे. होळाष्टकात केलेल्या शुभ कर्मांचे अशुभ फळ मिळते, अशी धार्मिक धारणा आहे. होलाष्टका दरम्यान कोणते नियम पाळायचे आहेत ते जाणून घ्या.
(Reuters)होळाष्टकादरम्यान हे नियम पाळा :
शास्त्रानुसार लग्न, नामकरण, गृहप्रवेश, मुंडन संस्कार इत्यादी अनेक शुभ कार्ये होलाष्टकादरम्यान निषिद्ध मानली जातात.
तसेच, होलाष्टक दरम्यान यज्ञ करू नये आणि कोणतीही गुंतवणूक किंवा व्यवसाय सुरू करू नये. नुकसान होण्याची शक्यता आहे.
होळाष्टक दरम्यान नवीन घरे, दागिने, कार आणि जंगम मालमत्ता खरेदी करू नये. या काळात घरबांधणीचे काम सुरू करू नये.
(REUTERS)या दिवसापासून सुरू होईल होलाष्टक :
पंचांगानुसार शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी १६ मार्च रोजी रात्री ९:३८ वाजता सुरू होईल. १७ मार्च रोजी रात्री ९:५२ वाजता संपेल. अशा परिस्थितीत १७ मार्चपासून होलाष्टक सुरू होऊन २४ मार्चला संपेल. त्यानंतर २४ मार्चला होळी आणि २५ मार्चला धुलिवंदन साजरी केली जाईल.
(ANI)