ब्लाउज डिझाइन - नवरात्रीचा सण खूप खास आहे. नऊ दिवस देवीच्या पूजेने प्रत्येक दिवस जणू सणासारखाच भासतो. दुर्गा देवीची उपासना, व्रत आणि गरबा नाईट्स अशा विविध कार्यक्रमांमध्ये महिला मोठ्या उत्साहात सहभागी होतात. नवरात्रीच्या नऊ दिवसांप्रमाणेच दसऱ्याचा सण विशेष असतो. दसऱ्याला सुंदर दिसण्यासाठी महिला खूप दिवस आधीपासून तयारी सुरु करतात. दसऱ्यासाठी तुम्ही साडी नेसणार असाल आणि तुम्हाला साध्या साडीत सुद्धा आकर्षक लुक हवा असेल तर तुम्ही त्यासोबत हे ब्लाउज डिझाइन पेअर करू शकता.
कलरफुल जॅकेटने बनवा तुमचा लुक नवीन - कोणत्याही साध्या साडीच्या ब्लाउजला फेस्टिव्ह लूक द्यायचा असेल, तर असे शॉर्ट किंवा लाँग लेंथचे जॅकेट कॅरी करा. हे बाजारात सहज उपलब्ध होतील. किंवा ते जुन्या लेहेंग्यापासून देखील बनवता येतात.
थ्रेड वर्क ब्लाउज - सिल्कची साडी असो किंवा सिंपल साडी असो त्यासोबत थ्रेड आणि मिरर वर्क असलेला ब्लाऊज नेहमीच आकर्षक दिसते.
नवीन लुकचा बनवा ब्लाउज - जर तुम्हाला एक सारख्या डिझाईनचे ब्लाउज घालून कंटाळा आला असेल तर या नवीन डिझाईनचा ब्लाउज घ्या. हे तुम्हाला हटके लूक देईल.
प्रिंटेड ब्लाउज - फुल स्लीव्ह आणि कॉलर ब्लाउज कोणत्याही साडीसोबत आकर्षक दिसतील. साडीच्या विरुद्ध रंगाशी मॅच केल्यास असे ब्लाउज खूप सुंदर दिसतात आणि एक हटके लुक देतात.
लाल ब्लाउज - हलक्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाउज सुंदर दिसतो. जर तुम्हाला दुर्गा पूजेसाठी तयार व्हायचे असेल तर तुम्ही असे लाल रंगाचे ब्लाउज शिवून घेऊ शकता.
मणी असलेला ब्लाउज - तुमच्या वॉर्डरोबमध्ये मोत्याची एम्ब्रॉयडरी असलेला ब्लाउज ठेवा. कोणत्याही शिमरी वर्क किंवा प्लेन साडीसोबत मॅच करून तुम्हाला स्पेशल लुक मिळू शकतो.