(7 / 7)दर्श अमावस्येचे महत्त्व : हिंदू धर्मात दर्श अमावस्या हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे, जो पित्रांशीही संबंधित आहे. हा दिवस पित्रांना समर्पित आहे. या दिवशी पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात. या दिवशी पितरांची पूजा, तर्पण आणि पिंडदान करणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असेल तर या दिवशी विशेष पूजा केल्याने तो दोष दूर होतो. पितरांना प्रसन्न केल्याने घरात सुख-शांती टिकून राहते.