(9 / 8)माथेरान-नेरळ- हा रस्ता महाराष्ट्रातील माथेरान आणि नेरळला जोडतो. नागमोडी वळणाच्या या रस्त्यावर गाडी चालवताना मन घाबरून जाते. हा रस्ता लोण्यासारखा गुळगुळीत असला तरी तो इतका अरुंद आहे की गाडीचा वेग वाढवता येत नाही. डोंगरांनी वेढलेले माथेरान हे निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील घनदाट जंगलात बिबट्या, हरीण, मलबार, महाकाय खारुताई, कोल्हा, रानडुक्कर, मुंगूस, लांडगा असे प्राणी आढळतात.