बॉलिवूडमध्ये सतत वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतात. यामधील काही चित्रपट हे सत्य घटनांवर देखील आधारित असतात. चला जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत…
२०१६ रोजी दंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात गीता आणि बबिता फोगाट यांची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटातील आमिर खानचा अभिनय कौतुकास्पद होता.
२०१९ साली प्रदर्शित झालेला सुपर ३० हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपट बिहारमधील शिक्षक आनंद कुमार यांची कथा दाखवण्यात आली होती.
अॅसिड अटॅक सर्वायवल लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर छपाक हा चित्रपट आला होता. या चित्रपटात दीपिका पादूकोण महत्त्वाच्या भूमिकेत होती.
२०१६मध्ये आलेला एम एस धोनी हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन एमएस धोनीच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुत महत्त्वाच्या भूमिकेत आहे.