पुण्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली. झाडांच्या फांद्या रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. मोठे झाड शनिवार वाड्याच्या भिंतीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या ऐतिहासिक शनिवार वाड्याला देखील शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला आहे. वाड्याच्या भिंतीवर मोठे झाड कोसळले आहे.
शनिवार वाड्याच्या परिसरात असलेले मोठे झाड हे वाड्याच्या भिंतीवर कोसळल्याने संरक्षक भिंतींचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी येतून हे झाड काढले, मात्र, या घटनेमुळे पुण्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या वाड्याची पडझड झाली.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. रस्त्यात पडलेल्या झाडांच्या फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस मोकळे करून देण्यात आले.
पुणे शहरात शनिवारी सायंकाळी जोरदार मुसळधार पाऊस पडला. पावसासोबत वादळी वारे आणि वीजांचा कडकडाट देखील झाला. लोहगाव, ढोले पाटील रोड, पद्मावती पंपिंग स्टेशन, सहकार नगर, औंध, गुरुवार पेठ, एनआयबीएम रोड, शनिवार वाडा, घोरपडी पेठ, कसबा पेठ, धानोरी, कर्वेनगर, खडकमाळ आळी, एम जी रोड, शिवाजीनगर, महर्षीनगर, मार्केट यार्ड, राजेंद्र नगर, विमान नगर, बाणेर, रास्ता पेठ इत्यादी ठिकाणी झाडे कोसळली.