(2 / 13)मेषः आज चंद्र शनि प्रतियोगात असल्याने आर्थिक प्रगती करण्याच्या विचाराबरोबर आपण आपले आरोग्यही जपा. घरातील मागच्या पिढीच्या लोकांशी मात्र मतभेद होण्याची शक्यता आहे. नियोजन आणि शिस्तीची फारकत होतील. व्यवसायिकांना व्यवसाया साठी अडचणीतून मार्ग काढावा लागेल. शुल्लक कारणांवरुन मानसिक भिती आपणास वाटेल. प्रेमिकांना एकमेकांच्या वागण्यामुळे मानसिक त्रास होईल. आपले विचार कमी जुळतील. कोर्टकचेरीचे प्रसंग सध्या टाळावेत. प्रकृतिकडे दुर्लक्ष करुन जमणार नाही. प्रवासात काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाहन चालविण्यास ग्रहमान विरोधी आहे. आपल्या संशयी स्वभावावर आळा घाला. काही मनस्ताप देण्यासारख्या घटना अनुभवास येतील.शुभरंग: केसरी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०४, ०६.