(5 / 13)कर्क: आज ग्रहमान अनुकुल आहे. बुद्धीच्या जोरावर अनेक कामे मार्गी लागतील. अधिकाराच्या जागेवर असणाऱ्यांना मानसिक स्वास्थ्य देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या बाबतीत दुसऱ्यांना कामाला लावाल. मर्दानी खेळ खेळणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहेत. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी येतील. प्रवासात थोडा त्रास होण्याची शक्यता असल्यामुळे उत्तम नियोजन करणे आवश्यक ठरेल. कामात यश मिळण्याचे योग आहेत. जास्त फायदा मिळण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न फायदेशीर राहतील. व्यापारात फसव्या योजनेवर विश्वास ठेवू नका. आर्थिक गुंतवणुक करताना विचारपूर्वक करा. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरीत कामाप्रती सजग राहा. आळस दूर ठेवा. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल.शुभरंगः पांढरा,शुभदिशाः वायव्य.शुभअंकः ०२, ०६.