(2 / 13)मेष: आज वणिज करणात काही भाग्यदायक घटना घडतील. तीर्थयात्रेला जाण्याचे बेत आखाल. कुटुंबासाठी एखादा त्याग करावा लागेल. काहीबाबतीत गैरसमजाला तोंडही द्यावे लागेल. व्यवसायात कामगारांच्या सहकार्याने कामाचा गाडा बराच ओढून न्याल. तुमच्या नवीन कल्पनांच स्वागत होईल. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. कुटुंबासाठी वेळ मिळेल. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. क्रोधावर मात्र नियंत्रण ठेवा. पत्नी व पुत्र यामुळे काहीसा मानसिक त्रास सोसावा लागेल. ललित कला व शिल्पशास्त्रांकरीता तसेच कला क्षेत्रातील व्यक्तींना दिवस चांगला आहे. आपल्या तार्किक बुद्धीने प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. कामानिमित्त केलेल्या दुरवरच्या प्रवासातून लाभ होतील.शुभरंगः केशरी शुभदिशाः दक्षिण.शुभअंकः ०२, ०६.