(3 / 13)वृषभः आज प्रतिकूल चंद्रभ्रमणात दिनमान आपणास काहीस त्रासदायक ठरणार आहे. कार्यक्षेत्रात उर्जा कमी राहिल. जवळच्या मित्राच्या भरवशावर रहाल परंतु लाभ मिळणार नाही. थोडे मनःस्तापाचे प्रसंग येतील. व्यापार व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. तुमच्या स्वभावा तील लहरी पणा थोडा इतरांना जाचकच होणार आहे. मनावरचा संयम सुटण्याची शक्यता. आहे. आर्थिक गुंतवणूक कराल. आपले सर्व व्याप सांभाळून धार्मिक गोष्टी करण्याकडे कल राहील. मित्र परिवारामध्ये रमाल. भांडण वादविवादामुळे मानसिक त्रास वाढेल. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न ठेवा. नातेसंबंधाविषयी मनात कटुता तिरस्कार निर्माण होण्याची शक्यता आहे. आशावादी दृष्टीकोनातून सतत विचार करावा. शुभरंग: पांढरा, शुभदिशा: आग्नेय.शुभअंकः ०२, ०७.